पेठवडगाव : जास्तीत जास्त कार्यकर्त्याना पक्षात घेऊन त्यांचे सन्मानाने स्वागत करून राष्ट्रवादी पक्ष भक्कम करा. राज्यात पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने पक्षबांधणीला महत्व द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
पेठवडगाव येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कामगार मंत्री हसन मुश्रीफ होते.यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुलक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, रोहित पाटील ,शीतल फराकटे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, हातकणंगले व करवीर तालुक्यात पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य नसल्याने अध्यक्ष करताना कसरत होत आहे. ती उणीव भरून काढून तालुक्यात सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पक्षाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल. वडगावसाठी लवकरच दहा कोटी रुपयांचा निधी दिला जाईल.
प्रास्ताविक तालुका विधानसभा अध्यक्ष व सरपंच संभाजी पवार यांनी केले. यावेळी प्रविता सालपे, माजी आमदार राजीव आवळे, सुनिता पोळ, उर्मिला जाधव, निलोफर खतीब, महंमद महात, वसंतराव चव्हाण, सागर खाडे, बी. के. चव्हाण, परशुराम किर्तीकर यांची भाषणे झाली.
स्वागत हर्षवर्धन चव्हाण यांनी केले. आभार फिरोज बागवान यांनी मानले