मुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनेत कलगीतुरा !

मुंबई : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु असतानाच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे. यावरून मंत्री यशोमती ठाकूर व शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यात तू तू – मै मै सुरु आहे.

काल, रविवारी अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व सभागृहाचे लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रम आयोजित झाला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्याबरोबरच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलतांना मुख्यमंत्री पदाबाबद मोठं वक्तव्य केलं.

मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर भाषणामध्ये म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं. शरद पवार मंचावर बसलेले असतानाच यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. असं असतानाच महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री पद असणाऱ्या शिवसेनेनं या वक्तव्यावर लगेच प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळेच शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमधील धुसपूस थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचली आहे.

 यावर बोलताना शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, शरदराव पवार यांची कार्यक्षमता आणि नेतृत्वावर शंका नाही. त्यांना युपीएचे अध्यक्षपद द्यावे, त्याचा सगळ्या भारताला फायदा होईल, असा प्रस्ताव द्याल का यशोमतीताई ?, असा सवाल त्यांनी केला आहे.

🤙 9921334545