विरोधी पक्षांना एकत्र करणार, पण, अध्यक्षपद स्वीकारणार नाही : शरद पवार

कोल्हापूर : भाजप विरोधात विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधण्यासाठी प्रयत्न करेन, पण, यूपीए आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी स्वीकारणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष सक्षम हवा, भाजप विरोधात देशांत ज्यांची नाराजी आहे. आणि ज्या पक्षाचा विस्तार देशभर आहे. अशा पक्षाने पुढे यावे.

पवार म्हणाले, सध्या देशात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. यापूर्वी आम्ही तपास यंत्रणेचा कधी वापर केला नाही. ईडी हा शब्द कोणाला माहित होता का? पण भाजपमुळे तो सर्वांना माहिती झाला. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज वाढत आहेत. हे कधी पाहिलं नव्हतं. भाजपचे राज्य आल्यानंतर इंधनाच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. या सगळ्यांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना मोजावी लागत आहेत. मात्र या मुद्द्यांवर केंद्र सरकार काहीच बोलायला तयार नाही. सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशी भूमिका या सत्ताधारी पक्षाने घेतली आहे. आपण भारतीय आहोत ही भावना रुजवण्याऐवजी वेगळं वातावरण जाणीवपूर्वक तयार केलं जात आहे. काश्मीर फाईल्स चित्रपटावरून नागरिकांत संताप निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

🤙 8080365706