चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत नानांच्या विजयासाठी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचे अंबाबाईला साकडे

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार सत्यजित (नाना) कदम ह्यांच्या विजयासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी अंबाबाईला साकडे घातले. मंदिर परिसरात पार पडलेल्या ह्या कार्यक्रमाला भाजपच्या फायर ब्रांड महिला नेत्या चित्राताई वाघ, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, भागीरथी संस्थेच्या अरुंधती महाडिक उपस्थित होत्या. या प्रसंगी ‘सक्षम महिला सक्षम देश’ ह्या महिला विषयक प्रचार पत्रकाचे अनावरण करण्यात आले.

कोल्हापूर उत्तरमध्ये सुमारे ५१ टक्के महिला मतदार आहेत. ह्याच महिला मतदार नानांचे विजयी मताधिक्य ठरवणार आहेत असे नमूद करत चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, “ आपल्या देशाचे सर्वाधिक कार्यक्षम आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकार हे देशातील सर्व वयोगटाच्या महिलांच्या उन्नतीसाठी जाणीवपूर्वक सातत्याने कार्यरत आहे. केंद्र सरकार सोबत देवेंद जी फडणवीस ह्यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन राज्य सरकार देखील महिलांच्या आर्थिक उन्नती आणि सुरक्षे साठी विविध योजना यशस्वीपणे राबवीत होते. दुर्दैवाने मागील अडीच वर्षात राज्यातील महाविनाश आघाडी सरकारच्या काळात अशा प्रकारच्या कुठल्याही नवीन योजना अथवा पूर्वीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी हि होताना दिसत नाही.

उत्तर कोल्हापूर मधील प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी म्हणून भागीरथी संस्था यापुढे देखील कार्यरत राहील असे नमूद करून महिलांच्या उन्नतीसाठी पंतप्रधान मोदी हे अहोरात्र काम करत आहेत असे अरुंधती महाडिक म्हणाल्या.

उद्यापासून मतदारसंघातील प्रत्येक महिला मतदाराला भाजपच्या महिला कार्यकर्त्या भेटून हे पत्रक देवून नानांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत, अशी माहिती शौमिका महाडिक ह्यांनी ह्यावेळी दिली.

🤙 8080365706