कोल्हापूर: शेतकरी, युवक, महिला, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह समाजातील विविध घटकांशी जिल्हा परिषदेचा थेट संबंध येत असतो. या सर्व घटकांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवा,असे आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तानाजी पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत आभार मानले.यावेळी घाटगे यांच्या हस्ते उपाध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
घाटगे पुढे म्हणाले,केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आहे.विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,दोन्ही उपमुख्यमंत्री,मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्याची संधी आहे.याचा उपयोग करुन घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिका-यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत.त्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्री तसेच शासन पातळीवर आपण स्वतःत्यांच्या सोबत ठामपणे राहू.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तानाजी पाटील यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, जिल्ह्यातील सर्व घटकांचा विकास साधण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
