कोल्हापूर:शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान अधिविभाग, DOT) ‘टेक्नोसिस २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेचे रसायन अभियांत्रिकी शाखेतर्फे आयोजन करण्यात आले. विविध महाविद्यालयांतील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट मॉडेल, क्विझ, प्रॉडक्ट मॉडलिंग, गेमिंग व रील मेकिंग, या स्पर्धेत सहभाग घेतला.

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते, तर प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. देशमुख यांनी आपल्या भाषणात ध्येय, ज्ञान व अथक परिश्रम ही यशस्वी होण्याची त्रिसूत्री असल्याचे सांगितले. शाश्वत विकासासाठी इंजिनिअरिंगचा उपयोग कसा करता येईल, या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. कोळेकर यांनी शाश्वत विकासाच्या तंत्रज्ञानाची मोठी आवश्यकता असल्याचे सांगितले.
स्पर्धा समन्वयक डॉ. श्रीपाल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अरीबा पटेल आणि अक्षदा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. रक्षिता भोईर आणि संदेश गुळमकर यांनी आभार मानले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रभारी संचालक डॉ. कोळेकर आणि रासायनिक अभियांत्रिकीचे समन्वयक डॉ. प्रवीणकुमार पाटील यांच्या उपस्थितीत झाले. डॉ. डी एम. नांगरे, डॉ. ए.बी. मडावी, डॉ. प्रशांत पाटील, वैशाली मोहिते, शितल देहनकर, निकिता दिंडे आणि श्वेता सावंत ,मयूर टक्केकर, सुदेश देसाई आणि आदित्य पाटील यांच्यासह रासायनिक अभियांत्रिकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
