कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने गोकुळच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्य गोकुळ आईस्क्रीमचा शुभारंभ, गोकुळ श्री स्पर्धा व विविध बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ, प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला.

निश्चितच हे ग्राहकांच्या पसंतीस उतरेल.
‘गोकुळश्री’ स्पर्धा व विविध बक्षीस वितरण करण्यात आले असून सुमारे १३ लाख रुपयांची बक्षिसे दूध उत्पादक, संस्था व वितरकांना देण्यात येत आहेत. महिला दूध उत्पादकांच्या सन्मानासाठी ‘नारी सन्मान योजना’ सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत महिलांना २ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. तसेच दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीच्या सहकार्याने पॅरामेट्रिक विमा योजना सुरू करण्यात आली असून तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास प्रति जनावर प्रतिदिन ५०० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. दुग्ध व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी गोकुळ दूध संघ AI आधारित आधुनिक गोठा प्रणाली सुरू करणार आहे. याशिवाय नेदरलँड्समधील तज्ज्ञांच्या माध्यमातून दूध उत्पादक व पशुवैद्यकांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली, मान्यवरांच्या हस्ते केक कापून ६३ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे स्वागत संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे तसेच यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले.
तसेच यावेळी सन २०२४-२५ या सालात जिल्ह्यास्तरीय तसेच तालुकास्तरीय गाय/म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा संस्था, म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा संस्था, म्हैस उत्तम प्रत दूध पुरवठा, गाय/ म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा (महिला संस्था), तसेच कोल्हापूर, पुणे व मुंबई येथील जास्तीत-जास्त दूध विक्री करणा-या दूध दुग्धजन्य पदार्थ वितरकांचाही सत्कार व बक्षीस वाटप व माजी गोकुळच्या अधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या उपस्थित करण्यात आले.
याप्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार राजेश पाटील, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, संचालिका सौ.स्मिता गवळी, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वितरक, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
