कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) ६३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गोकुळने उत्पादित केलेल्या “गोकुळ आईस्क्रीम” शुभारंभ तसेच ‘गोकुळ श्री’ पुरस्कार, विविध बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफसो व सार्वजनिक आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकरसो आणि माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटीलसो यांच्या शुभहस्ते तसेच जिल्ह्यातील आमदार व मान्यवर व चेअरमनसो, संचालक मंडळ यांच्या उपस्थित होणार आहे.

हा कार्यक्रम रविवार दिनांक – १५/०३/२०२६. इ.रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता संघाच्या गोकुळ प्रकल्प, एम.आय.डी.सी. गोकुळ शिरगाव येथे होणार आहे.
