कोल्हापूर:कोल्हापूर महानगर परिवहन (KMT) बसला काल शहरातील दाभोळकर कॉर्नर परिसर येथे अचानक आग लागण्याची घटना घडली असताना प्रसंगावधान राखत बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवून मोठा अनर्थ टाळणाऱ्या चालक विनायक गवळी आणि वाहक प्रशांत धुमाळ यांचा महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या आदेशानुसार, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्या सुचनेनुसार परिवहन समितीचे सदस्य रोहन अतिग्रे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.

जीव धोक्यात घालून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी दाखवलेले धैर्य हे खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आणि अनेक प्रवाशांचे प्राण वाचले, अशी भावना व्यक्त करत चालक-वाहकांचे कौतुक करत त्यांच्या कामगिरीचे अभिनंदन केले.
आणि अशा कर्मचाऱ्यांमुळेच सार्वजनिक सेवेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे सांगितले…… तसेच सदर आग वायरिंग शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागली शॉर्टसर्किट व्हायचं कारण काय याची सखोल चौकशी करून
के.एम.टी रूटवर जाताना पूर्ण तपासूनच रूटवर सोडण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले….
तसेच अशा धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी असून, त्यांच्या कार्याला सलाम व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवसेना सोशल मिडिया पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सौरभ कुलकर्णी, युवतीसेना शहरप्रमुख सौ. तेजस्विनी घाटगे,मयूर चौगुले आदी उपस्थित होते.
