अंबप येथील होम मिनिस्टर स्पर्धेत अनिता चव्हाण पैठणीच्या मानकरी महिला दिनानिमित आयोजन

 प्रतिनिधी किशोर जासूद:अंबप येथे अशोकराव माने सोशल फौंडेशन व एकता सखी मंचच्या वतीने महिला दिनानिमित घेण्यात आलेल्या न्यू होममिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीत झाला.यामध्ये अनिता चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवित मानाची पैठणी व टीव्ही संच पटकाविला.

 

 

द्वितीय,तृतीय,चतुर्थ व पाचवा क्रमांक अनुक्रमे आरती नाईकवडी,उज्वला डोईफोडे,सुप्रिया कांबळे,स्वप्नाली निले यांनी मिळविला.त्यांना अनुक्रमे वॉशिंग मशीन,फ्रिज,वॉटर प्युरिफायर,कुलर बक्षीस देण्यात आले.यावेळी शंभर महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ.अशोकराव माने यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयसिंह माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने होत्या.यावेळी माजी अर्थ व शिक्षण समिती सभापती प्रवीण यादव,नूतन जिल्हा परिषद सदस्या शीतलताई यादव,पंचायत समिती सदस्य मुकुंद पाटील उपस्थित होते.सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर, बालगायिका सह्याद्री मळे गावकर यांनी कार्यक्रमाची रचना करून यशस्वी केला.परिसरातील पाच गावातील महिला कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
आमदार अशोकराव माने म्हणाले,अंबप परिसरातील महिलांच्यासाठी विविध कार्यक्रम घेत महिला सक्षमीकरणाचे काम मनीषा माने करीत आहेत.त्यांच्या प्रयत्नांमुळे महिलांच्या प्रश्नांची मोठ्या प्रमाणात सोडवणूक झाली आहे.एकसंघपणे महिला एकत्र येऊन विविध उपक्रमात सहभाग नोंदवित आहेत.
विजयसिंह माने म्हणाले,महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून त्यांच्या समान हक्काची जनजागृती करण्याचे काम एकता सखी मंच करीत आहे.शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देणे आणि त्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवित त्यांच्या कर्तृत्वाला पाठबळ दिले जात आहे.
मनीषा माने म्हणाल्या,अंबप परिसरातील महिलांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रति वर्षी विविध उपक्रम राबविले जातात.यातून महिला सक्षमीकरणाची चळवळ गतिमान केली जात आहे.सत्ता असो वा नसो सामाजिक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून उपक्रम राबविण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
यावेळी नगरसेवक मोहनलाल माळी,राजेंद्र माने,प्रसाद पाटील,विश्वनाथ पाटील, संपत कांबळे, संतोष उंडे,भाग्यश्री सूर्यवंशी,सुवर्णा माने,डॉ.मोनिका पाटील,लतिका चव्हाण,
डॉ.प्रियांका माने,वैशाली खाडे,आकांक्षा पाटील उपस्थित होते.

🤙 8080365706