राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशातून छत्रपती शाहू महाराजांच्या कागलचा लौकिक उंचवा-राजे समरजितसिंह घाटगे;’शाहू’च्या मानधनधारक महिला कुस्तीगीरांचा विविध स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार

कागल:शाहू साखर कारखान्याच्या मानधनधारक महिला कुस्तीगीरांनी विविध स्पर्धांमध्ये मिळविलेले यश अभिमानास्पद आहे.अशा मेहनती खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जनक भुमी असलेल्या कागलचा क्रीडा क्षेत्रात लौकिक उंचवावा. असे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी काढले.
येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या कार्यालयात शाहू कारखान्याची मानधनधारक महिला कुस्तीगीर शिवछत्रपती पुरस्कार विजेती सृष्टी भोसले व सुकन्या मिठारी यांनी विविध स्पर्धेत उज्वल यश मिळविल्याबद्दल सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते.

राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राजाश्रय दिलेली कुस्ती कला लोप पावत चालली असताना पंचेचाळीस वर्षापुर्वी शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे साहेब यांनी शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून भरीव अर्थ सहाय्यातून कुस्तीसह सर्वच खेळाडूंना पाठबळ दिले. त्यांच्या पश्चात हाच वारसा चालवीत आहोत.
सृष्टीने “खेलो इंडिया” राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक तसेच कवठेपिरान व कोरेगाव येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत खुल्या गटात अजिंक्यपद मिळविले.तर सुकन्याने सांगली येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक, तर कवठेपिरान येथे सुवर्ण यश संपादन केले.या दोघींची हरियाणा येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

 

🤙 8080365706