पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

कोल्हापूर  :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाकडील वितरण शाखा व पाणीपट्टी शाखा यांच्यामार्फत थकबाकी व अनाधिकृत कनेक्शन धारकांवर संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनधिकृत नळ कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.

 

यामध्ये आज थकबाकी असलेली 27 कनेकशन व 7 अनाधिकृत कनेक्शन खंडीत करुन रोख रक्कम रुपये 5 लाख 83 हजार 299/- इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली. तसेच चेकद्वारे रक्कम 4 लाख 97 हजार 071 व ऑनलाईन जमा रक्कम 1 लाख 56 हजार 266 रुपये असे एकूण रक्कम रु.13 लाख 36 हजार 633/- इतकी रक्कम जमा झाली आहे.

सदरची कारवाई शहरातील गंजी गल्ली, लुगडी ओळ, रिकीबदार गल्ली, जवाहरनगर, महालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, न्यु शाहुपुरी, कसबा बावडा, कागलवाडी, डी.वाय.पी. कॉलेज परिसर, धनगर गल्ली, गोळीबार मैदान परिसर इत्यादी भागामध्ये कारवाई करुन कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली.

 

🤙 8080365706