‘एलसीबी’च्या या कारवाईने पोलिस दलात खळबळ

उजळाईवाडी : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडे 7 लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 4 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातील गोपनीय कॉन्स्टेबल एजाज महम्मद शेख (रा. करनूर, ता. कागल) आणि दफ्तरी हेड कॉन्स्टेबल नितीश मारुती कांबळे (रा. दऱ्याचे वडगाव, ता. करवीर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एलसीबी) अटक केली. ‘एलसीबी’च्या या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

 

 

 

मूळ तक्रारदाराविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात एक अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जाच्या चौकशीनंतर तक्रारदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पोलिस कर्मचारी एजाज शेख याने सहायक पोलिस निरीक्षक तबसूम मगदूम यांचे नाव सांगून 7 लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ‘एलसीबी’ने केलेल्या पडताळणीत एजाज शेख याने तडजोडीनंतर 4 लाख रुपये दोन दिवसांत घेऊन येण्यास सांगितले. यावेळी हेड कॉन्स्टेबल नितीश कांबळे हा प्रत्यक्ष उपस्थित असल्याचे निष्पण्ण झाले.
याप्रकरणी दोघांनाही ताब्यात घेऊन गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत

🤙 8080365706