पेठवडगाव शहराला बाह्यवळण रस्ता व्हावा; आ. अशोकराव माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर:हातकणंगले-पेठवडगाव मार्गावरील वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी पेठवडगाव शहराला बाह्यवळण रस्ता करण्यात यावा. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार अशोकराव माने यांनी विधानभवन येथे निवेदन दिले.

पेठवडगाव इचलकरंजी-शिरोळ गावातून कर्नाटक भागातून पुण्याकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. सण-उत्सव व सुट्ट्यांच्या काळात प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहनधारक, स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. पेठवडगावच्या आतून जाणारा रस्ता अरुंद असल्यामुळे मध्यवस्तीतच वाहतुकीची भीषण कोंडी निर्माण होते. त्यामुळे गावाबाहेरील पर्यायी रिंग रोडद्वारे

आमदार अशोकराव माने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात या मार्गास थेट पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्याची मागणी अनेक वर्षांपासून आली आहे. पेठवडगावसाठी या रिंग रोड संदर्भात शासनाने भूसंपादन प्रक्रिया, निधी तरतूद, प्राधिकरणाशी समन्वय आदी बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे.

तरी पेठवडगाव गावातील वाहतुकीची भीषण कोंडी नियंत्रणात करण्यासाठी या रिंग रोडकरिता तातडीने निर्णय व निधी उपलब्ध करावा, असे निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाला आदेश देण्याबाबत चर्चा झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर, महसूल होते. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित

🤙 8080365706