कोल्हापूर : देशातील सर्वाधिक ‘दरडोई उत्पन्न’ असणाऱ्या शहरांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश होतो. नागरी सुविधा आणि विकासाच्या आधारावर कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ‘टियर-२’ शहर म्हणून ओळखले जाते.

कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील शिक्षणाचे आणि उत्तम आरोग्य सुविधांचे मोठे केंद्र आहे. कला, संस्कृती, क्रिडा क्षेत्रातही कोल्हापूरचा नावलौकिक आहे. मंजूर झालेले आय.टी.पार्क व छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत मंजूर स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हबमुळे कोल्हापूर शहराच्या विकासाला नवे परिमाण मिळणार आहेत. आयटी, सेवा आणि पूरक उद्योगांच्या माध्यमातून परिसरात रोजगारासह मोठी आर्थिक उलाढाल होईल. येत्या काळात कोल्हापूरात औद्योगिक, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राची नवी क्रांती दिसून येईल. यासह इतर महत्वकांक्षी प्रकल्पाच्या निर्मितीतून कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापूरात मंजूर झालेल्या आय.टी.पार्क व छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत मंजूर स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हब बाबत माहिती देण्याकरिता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, कोल्हापुरात आय.टी. पार्क निर्माण करण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव मा.मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित होता. याबाबत मी गत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्नाद्वारे विधिमंडळाचे लक्ष वेधले होते. सदर प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री ना.इंद्रनील नाईक यांनी बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याबाबत सभागृहास आश्वासित केले होते.कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने दि.०५ मार्च २०२६ रोजी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव आणला. महसूल विभागाच्या प्रस्तावानुसार शेंडापार्क परिसरातील गट क्रमांक ५८३, ५८७ आणि ५८८ मधील एकूण ३४.३६ हेक्टर जागा आयटी पार्क विकसित करण्यासाठी एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा असलेला आयटी पार्क उभारण्याची योजना असून त्यातून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे. यामुळे कोल्हापूरमध्ये आयटी उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मितीला मोठी गती मिळेल. कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचे जाहीर आभार..!!
संस्थानातील जनतेने स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि व्यापार-उद्योगात प्रगती करावी, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी, या उद्देशाने त्यांनी या मिल्सला स्वत:ची जागा व आर्थिक पाठबळ देवून चालना दिली. अशा या पवित्र जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला व विचारांना साजेसे स्मारक आणि महाराजांच्या नावे टेक्स्टाईल टुरिझम हब (कापड पर्यटन केंद्र) निर्माण करण्यास वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांनी तत्वत: मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.
राजर्षी शाहू महाराजांच्या या कार्यामुळेच कोल्हापूर हे आजही ‘रयतेची आणि शाहू महाराजांच्या विचारांची राजधानी’ म्हणून ओळखले जाते. महाराजांनी ज्या उद्देशाने या मिल्सची स्थापना केली तो उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची, विचारांची प्रेरणा देणारे आणि व्यापार, उद्योगाद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे स्मारक कोल्हापूरवासियांना अपेक्षित आहे. यामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि करवीरसंस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या जाज्वल इतिहासाची साक्ष देणारे स्मारक व संग्रहालय, कापड उद्योगाचा इतिहास, जुनी यंत्रसामग्री आणि कापड विणण्याच्या पद्धती दर्शविणारे शाहू मिल म्युझियम, टेक्सटाइल इंजिनिअरिंग कॉलेज, इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, इस्टिट्यूट ऑफ फॅब्रिक डिझाइन, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक १००० ते १२०० आसन क्षमता असणारे ऑडिटोरीयम, संगीत विद्यालय, मिल्स शेजारी असणाऱ्या कोटीतीर्थ तलावाकडील बाजूचे सुशोभिकरण करून त्याठिकाणी पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने अॅम्युझमेंट पार्क आदींचा समावेश करण्याच्या सूचना मंत्रालयीन बैठकीत दिल्या आहेत. जेणेकरून या स्मारकाद्वारे राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण, उद्योग, कला क्षेत्राच्या उन्नतीसाठी असलेला उद्देश जपला जाईल.
या पत्रकार परिषदेस शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्रीताई जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक प्रसाद चव्हाण, नगरसेविका मंगलराय साळोखे, नगरसेविका कौसर बागवान, नगरसेविका अर्चना पागर, नेपोलीयन सोनुले, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष दीपक चव्हाण, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख रणजित जाधव, सुनील जाधव, इंद्रजित आडगुळे, अनिल पाटील, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, अरविंद मेढे, दुर्गेश लिंग्रस, उदय भोसले, राज जाधव, विनय वाणी, प्रभू गायकवाड, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.
