मुंबई:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक, विकासाभिमुख आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा आहे.राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा देणाऱ्या कर्जमाफीसारख्या निर्णयांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारा हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून लाखो शेतकऱ्यांना नव्या उमेदीने उभे राहण्याची संधी मिळेल.
याशिवाय उद्योग क्षेत्राला चालना देणाऱ्या तरतुदी, रोजगारनिर्मितीला गती देणारे उपक्रम, पायाभूत सुविधा बळकट करणारे प्रकल्प, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक तसेच पर्यावरण संवर्धनासंबंधीचे निर्णय यामुळे महाराष्ट्राचा विकास अधिक व्यापक आणि शाश्वत होईल.ग्रामीण व शहरी भागातील संतुलित विकासाचा विचार या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येतो.
