भटक्या कुत्र्याने तोडला चिमुकल्याच्या गालाचा लचका

कोल्हापूर:शहरातील शिवशंकर वसाहत परिसरात ६ वर्षीय उमेर मुजम्मिले बागवान हा मित्रांसोबत घराबाहेर खेळत होता. यावेळी एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात कुत्र्याने उमेरच्या गालाचा भीषण चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान उमेरचे वडील हयात नाहीत. तो आपल्या आई आणि मोठ्या बहिणीसह एस. के. पाटील
कॉलेज जवळील एका भाड्याच्या खोलीत राहतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. प्राथमिक उपचार सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केल्यानंतर जखमेचे गांभीर्य पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखलचा सल्ला दिला.

🤙 8080365706