कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या शास्त्रीनगर येथील यंत्र शाळेला आज मनपा परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांनी भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या.
के. एम. टी कार्यशाळा मेकॅनिकल सुपरवायझर रणधीर मोरे यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून त्यांनी सदर वर्कशॉप मधील समस्या जाणून घेतल्या.
यावेळी कामगारांनी आवश्यक सुटे भाग वेळेवर उपलब्ध होणे, अत्याधुनिक उपकरणांची गरज, तसेच मनुष्यबळ वाढविण्याची आवश्यकता याबाबत सूचना मांडल्या.
त्यानंतर वर्कशॉप ची पहाणी करून कचरा उठाव, स्वच्छता यासंबंधी माहिती घेतली, या दरम्यान श्री. अतिग्रे आणि शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांनी स्वतः स्वच्छता मोहीम राबवत परिसर स्वच्छ केला.
यावेळी बोलताना श्री अतिग्रे यांनी,
महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा. ना. राजेश क्षीरसागर यांनी परिवहन समिती सदस्य पदी निवड करून दिलेल्या संधीच सोनं करण्यासाठी आणि के. एम. टी ला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी सदस्य म्हणून प्रयत्न सुरु केले असून याचाच एक भाग म्हणून आज येथे भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली,या सर्व समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका आणि शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे,असे सांगून आज केएमटी वर्कशॉप च्या स्वच्छतेला सुरुवात करून दिली असून केमटी वर्कशॉप दर आठ दिवसातून एकदा पूर्ण स्वच्छ करण्याच्या सूचना महानगरपालिका आरोग्य विभागाला दिल्या असल्याचे सांगितले.
यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक अविनाश कामते,सौ. दीपाली अतिग्रे,केदार अतिग्रे, शिवसेना सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सौरभ कुलकर्णी, खंडेराव शहापुरे,निखिल रणसिंग, राहुल शिंदे, गणेश साळुंखे,स्वप्नील पाटील, केएमटी चे विजय सुतार, उमेश मेठे, रवी बोळके,उमेश सावंत,रफिक बागवान, उमेश पाटोळे उपस्थित होते.
