कोल्हापूर:
कोल्हापूर – दक्षिण मतदार संघातील करवीर पंचायत समितीचे माजी सभापती आणि काँग्रेसचे नेते, मुडशिंगीचे रहिवासी प्रदिप झांबरे यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला. भाजपचा स्कार्फ झांबरे यांच्या गळ्यात घालून, खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. झांबरे यांच्या भाजप प्रवेशामुळं आमदार सतेज पाटील गटाला मोठं खिंडार पडले आहे. झांबरे यांचा भाजपमध्ये योग्य मानसन्मान राखला जाईल, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
आमदार सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते आणि करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप झांबरे यांना मानणारा गट कोल्हापूर- दक्षिण मतदार संघात आहे. आमदार अमल महाडिक यांच्या कामामुळे प्रभावित होवून, प्रदिप झांबरे यांनी, सतेज पाटील गट सोडून, आज भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार धनंजय महाडिक यांनी प्रदिप झांबरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपचा स्कार्फ घालून पक्षात स्वागत केले. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण मतदार संघासह, संपूर्ण जिल्हयात विकासाचे अनेक प्रकल्प सुरू होत आहेत. अशा वेळेस मुख्य प्रवाहात राहण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार अमल महाडिक यांच्या सहकार्याने आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचं प्रदिप झांबरे यांनी सांगितले. तर झांबरे यांचा पक्षामध्ये योग्य मानसन्मान राखला जाईल, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. यावेळी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, मुडशिंगीचे तानाजी पाटील, आप्पासाहेब धनवडे, तानाजी धनवडे, गंगाराम माळी, बाबासाहेब पाटील, चंद्रकांत नेर्ले, शिवतेज झांबर
