कोल्हापूर:इचलकरंजी शहराच्या व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील वाढती व्याप्ती विचारात घेता, ग्राहकांना त्वरित आणि विश्वासार्ह सुवर्ण कर्ज सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आय. टी. आय. गोल्ड लोन’ (ITI Gold Loan) या नामांकित संस्थेच्या नवीन शाखेचे उद्घाटन आ . राहुल आवाडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
भाग्यलक्ष्मी कॉम्प्लेक्स, ए. एस. सी. कॉलेजजवळ असलेल्या या अद्ययावत शाखेमुळे परिसरातील नागरिक, व्यापारी आणि गरजू ग्राहकांना सुवर्ण कर्जाची सुविधा आता अधिक सुलभपणे मिळणार आहे.
