कोल्हापूर: छत्रपती शाहू आघाडीच्यावतीने कागल नगरपरिषदेच्या नूतन निवडून आलेल्या नगरसेवकांनी कागल येथे मंत्री हसन मुश्रीफ यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले व शुभेच्छा स्वीकारल्या.
यावेळी नगरसेवकांनी पुढील कार्यकाळात शहराच्या विकासासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करुन शहरातील नागरी सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष व नुतन नगरसेवक प्रकाशराव गाडेकर, दिपक मगर, जयवंत रावण, बाळासो माळी, सुशांत कालेकर, अरुण गुरव, बंडा बारड, आकाश पाटील, गजानन माने, उमेश सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
