मंत्री हसन मुश्रीफ व समरजीत घाटगे यांच्या उपस्थितीत कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

कोल्हापूरपंचायत समिती शिक्षण विभाग कागल व केंद्रशाळा बिद्री ता.कागल यांचे संयुक्त विद्यमाने 53 वे कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रदर्शनाचा मुख्य विषय विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM For Vikasit & Atmanirbhar Bharat असा आहे.

यावेळी मंत्री हसन मुश्रीफ,शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितराजे घाटगे, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर कार्तिकियन एस, माजी पंचायत समिती सभापती जयदीप पोवार, बिद्री कारखान्याचे संचालक भूषण पाटील, रावसो खिल्लारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ मीना शेंडकर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कागल सारिका कासोटे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, पंचायत समिती माजी सदस्य नंदकुमार पाटील, पांडूरंग पाटील, सरपंच पुजा पाटील, उपसरपंच सागर कांबळे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706