मनरेगाचे नाव बदलून महात्मा गांधीजींचे नाव पुसण्याचे भाजपकडून पाप! : आ. सतेज पाटील

कोल्हापूर:

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) नावात बदल करणारे विधेयक आणत असून या विरोधात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीकडून पापाची तिकटी येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ केलेल्या निदर्शनात ऋतुराज संजय पाटील यांच्यासह आ.सतेज पाटील सहभागी झाले .

मनरेगासारखी गरिबांना थेट रोजगार देणारी प्रभावी योजना बंद करण्याच्या दिशेने सरकार वाटचाल करत आहे, तर दुसरीकडे फक्त नावात आकर्षक पण प्रत्यक्षात लाभ न देणाऱ्या फसव्या योजना पुढे आणल्या जात आहेत. लाखो कुटुंबांना आधार देणारी हि योजना निधी कपात आणि तसेच महात्मा गांधींचे नाव हटवून जाणीवपूर्वक बंद करण्याचा घाट निषेधार्ह आहे अशा भावना आ . सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या.

यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, सह संपर्कप्रमुख विजयराव देवणे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, चंद्रकांत यादव, बबनराव रानगे, एड. तौफिक मुलाणी, कॉ. दिलीप पवार, भारतीताई पवार, दुर्वास कदम, एड. अभिषेक मिठारी, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, दिपक थोरात, उदय पोवार यांच्यासह इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

🤙 8080365706