महापालिकांसाठी निवडणुका जाहीर: 15 जानेवारीला मतदान,16 जानेवारीला निकाल

मुंबई: राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

मतदानाची तारीख – 15 जानेवारी

मतदानाचा निकाल – 16 जानेवारी राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करावं लागणार आहे.

या महापालिकांमध्ये निवडणूक होणार?

1. बृहन्मुंबई – 227

2. भिवंडी-निजामपूर – 90

3. नागपूर – 151

4. पुणे – 162

5. ठाणे – 131

6. अहमदनगर – 68

7. नाशिक – 122

8. पिंपरी-चिंचवड – 128

9. औरंगाबाद – 113

10. वसई-विरार – 115

11. कल्याण-डोंबिवली – 122

12. नवी मुंबई – 111

13. अकोला – 80

14. अमरावती – 87

15. लातूर – 70

16. नांदेड-वाघाळा – 81

17. मीरा-भाईंदर – 96

18. उल्हासनगर – 78

19. चंद्रपूर – 66

20. धुळे – 74

21. जळगाव – 75

22. मालेगाव – 84

23. कोल्हापूर – 92

24. सांगली-मिरज-कुपवाड – 78

25. सोलापूर – 113

26. इचलकरंजी – 76

27. जालना – 65

28. पनवेल – 78

29. परभणी – 65

 

 

 

🤙 8080365706