इचलकरंजी येथे चाय पे चर्चा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन

कोल्हापूर:इचलकरंजी प्रभाग क्रमांक १३ मधील त्यागी भवन, जिम्नॅशियम मैदानाजवळ येथे ‘चाय पे चर्चा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. म्हाळसाकांत कवडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आ . राहुल आवाडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.
​या कार्यक्रमास माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे आणि आ. राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. चहाच्या घोटासोबत अनौपचारिक गप्पा मारत नेत्यांनी प्रभागातील नागरिकांचे प्रश्न, सूचना आणि अपेक्षा आ . आवाडे यांनी समजून घेतल्या.
​यावेळी बोलताना आ . राहुल आवाडे म्हणाले  की, “अशा उपक्रमांमुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होते आणि विकासाला योग्य दिशा मिळते.”  म्हाळसाकांत कवडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन नेटक्या पद्धतीने केले होते. या चर्चेत स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

🤙 8080365706