मेरी वेदर क्रिकेट क्लब यांच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीसाठी ३० हजार शेणी दान

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या आवाहनानुसार मेरी वेदर क्रिकेट क्लब यांच्या वतीने ३० हजार शेनी दान करण्याचा उपक्रम राबवण्यात आला.

पंचगंगा स्मशानभूमी आणि कसबा बावडा स्मशानभूमी येथे या शेणी देण्यात आल्या.
गेली 35 वर्ष मेरी वेदर क्रिकेट क्लब आणि मित्र परिवार कोल्हापूर येथील मेरी वेदर क्रिकेट मैदान येथे नियमित सराव करतात.

यावेळी क्लबचे सदस्य अमर मार्ले यांनी बोलताना क्लबच्या इतर सामाजिक उपक्रमाबाबत सुद्धा माहिती दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे सर्व कमिटी मेंबर्स, खेळाडू आणि मित्र परिवाराचे सहकार्य लाभले.

प्रसंगी क्लब चे कमिटी मेंबर  महेश बेडेकर,  रविराज शिंदे, पंचगंगा स्मशानभूमी येथील आरोग्य निरीक्षक  सुशांत कांबळे क्लब चे इतर सदस्य निलेश भादुले, गौरव चव्हाण, रोहनराज शिंदे, निवास वाघमारे, संदीप चिगरे, ऋतुराज शिंदे आदी उपस्थित होते.

🤙 8080365706