कोल्हापूर -तळसंदे :-डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन

तळसंदे – डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे येथील रिसर्च सेंटरतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून ‘स्मार्ट हाय व्होल्टेज स्विचिंग युनिट’चे यशस्वी संशोधन करण्यात आले आहे. . ही यंत्रणा कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष हस्तक्षेपाशिवाय मोबाईल अॅपद्वारे सुरक्षितपणे हाय व्होल्टेज स्विचिंग करते. टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. एस. आर. पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. आरिफ शेख यांनी हे युनिट विकसित केले.

हाय व्होल्टेज स्विचिंगदरम्यान होणारे स्पार्क, अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. सर्व गोष्टींवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए आय) चा वापर करून योग्य व सुरक्षित नियंत्रण ठेवले जाते, प्रत्यक्ष मानवी हस्तक्षेपाविना ही यंत्रणा मोबाईल अॅपद्वारे कार्य करते. विद्युत संबंधित क्षेत्रात काम करणारे तंत्रज्ञ, कर्मचारी व व्यावसायिक यांना हि यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विद्युत निर्मिती, पारेषण व वितरण कंपन्या तसेच औद्योगिक, कृषी आणि वाहतूक क्षेत्रालाही या संशोधनाचा फायदा होणार आहे.

या प्रकल्पामध्ये द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल शाखेतील विद्यार्थी आकाश अमर घारसे, प्रज्वल विजय भगत, विपुल अनिल सोलंकुरे, दिक्षा सुरेश पाटील व श्रेया संतोष मालुसरे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रा. आर. एस. पवार व प्रा. एच. एस. नाईकवडी यांचेही सहकार्य लाभले.

या संशोधनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, डॉ. एस. आर. पावसकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

यावेळी एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिट.
तळसंदे: एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिट सोबत डॉ एस. आर. पावसकर, प्रा. आरिफ शेख व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

🤙 9921334545