एन. वाय पाटील याचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आमदार अशोकरावजी माने

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) :पाडळी (ता. हातकणंगले) येथील पाडळी गावचे सुपुत्र मा श्री एन. वाय पाटील सर यांचा मुख्याध्यापक कन्या विद्या मंदिर लाटवडे केंद्रप्रमुख – केंद्र भादोले या शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात 39 वर्ष च्या प्रदीर्घ सेवानिवृत्ती समारंभ जोतिबा मंगल कार्यालय पाडळी येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने आमदार डॉ. विनय कोरे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या अध्यक्षतेखाली व बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला..

यावेळी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघ नेते संभाजीराव थोरात तात्या, शिक्षण विस्तार अधिकारी जि. प कोल्हापूर रवींद्र ढोकळे, राजेंद्र माने सर, आदर्श मुख्याध्यापक सरदार पाटील, विस्तार अधिकारी शिरोळ सौ भारती कोळी मॅडम, छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संघ अध्यक्ष शशिकांत पाटील, शिक्षक नेते इंद्रजीत कदम, माजी सरपंच पाडळी प्रकाश पाटील, माझी शिक्षक बँक राजमोहन पाटील, अरुण चाळके सर, घुगरे सर, नागेश शिनगारे सर, तंटामुक्त अध्यक्ष सुधीर पाटील, राजेंद्र मुळीक यासह भागातील शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . विनोद शिंगे कुंभोज

🤙 9921334545