फादर डेचा निमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम

कुंभोज (विनोद शिंगे)
कुंभोज गावचे सुपुत्र संभाजी माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे चिरंजीव युवा नेते विश्वजीत माने व राहत मुल्ला यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने आपल्या वडिलांचा वाढदिवस आग्र्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी वडिलांचा वाढदिवस व फादर डे च्या निमित्ताने भौगोलिक परिसरात असणाऱ्या वृद्धाश्रमात जाऊन सदर परिसरातील वुद नागरिकांना फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या जेवणासाठी तांदळाची पोती भेट दिली.

 

यावेळी त्यांनी वाढदिवसाचा वायफळ खर्चाला फाटा देऊन एक सामाजिक उपक्रम राबवला परिणामी त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र चर्चा होत असून कुंभोज परिसरातील युवकांनी वाढदिवसाच्या होणाऱ्या वायफळ खर्चाला फाटा देऊन आपण समाज उपयोगी कार्य करावे असेही आव्हान राहत मुल्ला त्यांनी यावेळी उपस्थित त्यांना केले. यावेळी विश्वजीत माने ,संदीप तोरस्कर, सौरभ सपकाळ ,गौरव सपकाळ,प्रणव तोरसकर,राहत मुल्ला,विशाल नेजकर,केतन सपकाळ,राहुल माळी,दिक्षात भोसले,अक्षय काशिद, अजुन पांडव उपस्थित होते.

🤙 9921334545