शंकरवाडी येथे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हनुमान मंदिर व विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

कोल्हापूर : शंकरवाडी येथे २ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या हनुमान मंदिर व विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.या अंतर्गत हनुमान मंदिराचा लोकार्पण व गावातील अंतर्गत रस्त्यांचे लोकार्पण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत, भविष्यातही अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील , केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे, पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तोडकर, धनाजी पाटील, शेंडुरचे माजी सरपंच अजित डोंगळे, माजी सरपंच अभय पाटील, पांडुरंग पाटील, सुनील पाटील, सरपंच आक्काताई सुतार, उपसरपंच संगीता लोहार, अभिजीत पाटील, केदारी घराळ, व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545