कोल्हापूर : (सचिन बा.पाटील) :
शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांच्या नावाने अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध,शिवसेना शहरप्रमुख संदीप पाटील याचेसह मित्रपरिवार बसत असलेल्या कट्ट्यावर अज्ञाताने विजय अपराध यांचे बाहुलीवर नाव लिहून त्यावर लिंबू, हळदी-कुंकू, बिब्बा,अंगाराच्या पुड्या व बाहुलीला टाचण्या टोचून जादूटोणा करण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी वडगाव शहरातील ज्वलंत प्रश्नावरून विविध आंदोलने केली होती.यामध्ये नागोबावाडी रोडवरील शौचालये,क्रिडा संकुल व नुकतेच सर्वसुविधायुक्त सरकारी दवाखाना व्हावा यासाठी आंदोलन छेडले होते. या आंदोलनास शासकीय पातळीवर तसेच लोकप्रतिनिधींकडून दखल घेवून सकारात्मक भूमिका घेतली होती. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न अपराध यांचा सुरू होता. यासर्व प्रश्नाचे श्रेय विजय अपराध यांना मिळणार मिळत आहे.त्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी
अज्ञाताने जादूटोणा करून त्यांना थांबविण्यासाठी हे असे कृत्य केले असावे.अशी चर्चा नागरिकांच्यातून होत आहे.
मी थांबणार नाही : विजय अपराध
शहरातील विविध ज्वलंत प्रश्नावरून आंदोलन करून आवाज उठवत आहे. या प्रश्नाची शासनदरबारी सोडवणूक होत आहे.यामुळे काहीना यांचे श्रेय मिळत नसल्यामुळेच माझ्यावर अघोरी कृत्य करून थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.परंतु मी असल्या अंधश्रद्धेला भीक न घालता नागरिकांच्या हितासाठी थांबणार नाही.तर अधिक जोमाने लढत राहू.असे विजय अपराध यांनी म्हंटल आहे.