इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वारसा हक्काने मिळणाऱ्या नोकरी पत्रकाचे वाटप

कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वारसा हक्काने मिळणाऱ्या नोकऱ्यांचे पत्रक वाटपाचा कार्यक्रम नुकताच थाटात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल आवाडे व इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते संबंधित लाभार्थ्यांना नोकरी पत्रकांचे वितरण करण्यात आले.

           

 

हा उपक्रम वारसा हक्काच्या आधारावर नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबांसाठी दिलासा देणारा ठरला. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभणार असून, त्यांच्या नोकरीच्या अधिकाराला न्याय मिळाला आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून पार पडलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले.

कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलाकाते, माजी सभापती श्रीरंग खवरे, माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक रवी जावळे, श्रेणिक मगदूम, महानगरपालिका पदाधिकारी के. के. कांबळे, नौशाद जावळे, कृष्णात गोंधुकुपे, उपायुक्त, लेबर ऑफिसर राजापूरे, बंडू मुळीक, नितेश पोवार, इम्रान मकानदार, भारत भोंगार्डे, कपिल शेटके, धनंजय पळसुले, सुनील बेलेकर यांच्यासह महानगरपालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुस्थितीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. उपस्थित मान्यवरांनी महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक करत, भविष्यातही असेच लोककल्याणकारी उपक्रम सातत्याने राबवले जावेत, असे मत व्यक्त केले.

या उपक्रमामुळे एक सकारात्मक संदेश समाजात गेला असून, प्रशासन आणि जनतेमधील विश्वास वृद्धिंगत झाला आहे. इचलकरंजी महानगरपालिका आणि माझ्या पुढाकारामुळे अनेकांचे जीवन उजळण्याची संधी मिळाली आहे.

🤙 9921334545