श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रे या बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन उत्साहात

कोल्हापूर : श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रे या बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या पार्श्वभुमीवर सभासदांना भेटवस्तू प्रदान कार्यक्रमाला सहकारमंत्री नाम. बाबासाहेब पाटील यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ होते . यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार चंद्रदिप नरके, जि. प. माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर यांचीही उपस्थिती लाभली.

     

 

सहकारामध्ये कोणतही राजकारण न आणता ती टिकवण्यासाठी तसेच अनेक आव्हानवर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशा भावना व्यक्त करताना सरकारकडे राज्यातील शेतकऱ्यांची माहीती असतानाही शेतकऱ्याला दरवेळी केवायसी करावी लागत आहे. हे थांबण्यासाठी राज्याचे कृषी खाते आणि सहकार खात्याने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी विनंती मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सहकारमंत्र्यांना केली.

यशवंत सहकारी बँकेच्या या यशस्वी घौडदौडीत संस्थापक अध्यक्ष शंकरराव द. पाटील, माजी अध्यक्ष पी. आर देसाई यांचा मोलाचा वाटा आहे.

या सोहळ्याला कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते, गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी), बाळासाहेब खाडे, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष शामराव सुर्यवंशी, युवराज पाटील कुडीत्रेकर, कुंभी- कासारी साखर कारखान्याचे संचालक संजय बी. पाटील, भगवंत बी. पाटील, शेतकरी संघाचे चेअरमन बाबासाहेब शिंदे, अनिल सोलापुरे, बँकेचे अध्यक्ष महेश पाटील- शिंगणापूरकर, माजी अध्यक्ष प्रकाश देसाई, अमर पाटील- शिंगणापूरकर, उपाध्यक्ष भगवंत पाटील, कार्यकारी अधिकारी रमेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर व बँकेचे संचालक मंडळ, पदाधिकारी, सभासद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545