कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या स्पर्धेमध्ये पुणे विभागातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूर या बँकेला सन २०२३ -२४ सालासाठी कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराबद्दल बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड-मुंबई यांच्यावतीने दरवर्षी सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी बँकांना पुरस्कार वितरण केले जाते. पुरस्कार वितरणाचे हे २६ वे वर्ष आहे. सन २०२२-२३ या आर्थिक सालासाठीही बँकेला उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती बँक हा विशेष पुरस्कार मिळाला होता.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक ए. वाय.पाटील यांच्यासह इतर मान्यवर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

🤙 9921334545