खा. धैर्यशील माने यांच्या हस्ते हुपरी येथे श्री हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा

कोल्हापूर : आज श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर, हुपरी येथे वास्तुशांती होमहवन आणि श्री हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या श्रद्धा व दिमाखात पार पडला.

याप्रसंगी प. पू. ईश्वर महाराज, मठाधीश हंचीनाळ यांच्या पावन उपस्थितीत, खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते या धार्मिक विधींचे पूजन सुफळ संपूर्ण झाले.
या सोहळ्याला माजी आमदार सुजित मिणचेकर आणि गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव हेदेखील उपस्थित होते.
धार्मिक परंपरेचा गौरव राखणाऱ्या या मंगल प्रसंगास उपस्थित राहून लाभलेला आध्यात्मिक साक्षात्कार निश्चितच अविस्मरणीय ठरेल.असे उद्गार खा. माने यांनी काढले.

🤙 9921334545