अंबप (किशोर जासुद)
अंबप – जय शिवराय कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ (चावडी ग्रुप), अंबप यांच्या वतीने अमावस्या निमित्ताने श्री नागनाथ देवालयात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन दिनांक 27/5/2025 रोजी सकाळी ठीक 8:00 वाजता होणार आहे.
या पवित्र प्रसंगी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. धार्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे गावातील संस्कृती जपली जाते, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.