मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत नांदोबा देवालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : नांदोली (ता.भुदरगड) येथील ग्रामदैवत श्री नांदोबा देवालयाच्या नूतन वास्तूचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण व लोकार्पण सोहळा मंत्री प्रकाश आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मंत्री आबिटकर यांनी उपस्थित राहून आशीर्वाद घेतला व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कोकन केसरी के.जी.नांदेकर साहेब, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, अंकुशबापू चव्हाण, बाबा नांदेकर, संदीप वरंडेकर, धनाजी देसाई, सरपंच मयुरी पाटील, मंदीर कमिटी अध्यक्ष शिवाजी पाटील, प्रकाश चव्हाण, विलास कांबळे यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545