शहापुर येथे बिरदेव जळपरडी यात्रा महोत्सव 

कुंभोज (विनोद शिंगे)
श्री बिरदेव मंदिर, शहापूर चौक येथे पारंपरिक श्रद्धा आणि भक्तीभावाने “श्री बिरदेव जळपरडी यात्रा महोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या पावन प्रसंगी आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रम आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमास एक वेगळीच प्रेरणा लाभली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत आशीर्वाद प्राप्त केला.

यावेळी दादासो भाटले, सचिन हिरवाडे, राजू कबाडे, रणजीत अनुशे, अशोक पुजारी, मधुकर देसिंगे, संदीप सोलगे, संजय कबुर सर, सोनाली अनुशे उपस्थित होत्या.

🤙 9921334545