महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची कोल्हापूर महानगरपालिकेला भेट

कोल्हापूर  : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची आज कोल्हापूर महानगरपालिकेस भेट देऊन प्रदूषण नियंत्रणाबाबत महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या उपाय योजनांचा त्यांनी आढावा घेतला. सदरची बैठक दुपारी आयुक्त कार्यालयातील मिटींग हॉल मध्ये घेण्यात आली. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.

    

प्रारंभी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या विविध उपाय योजनांचे सादरीकरण स्लाईड शोद्वारे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले. यानंतर सिध्देश कदम यांनी पंचगंगा नदी प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, सिंगल युज प्लॅस्टीक कारवाई, हवा शुध्दीकरण इत्यादी विषयावर चर्चा केली. यांनतर पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी नदीमध्ये मिसळणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया नदीलगतच्या गावांनाही प्रयत्न करावा लागेल. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर कशा पद्धतीने करता येईल याचे नियोजन महापालिकेने करावे. घनकच-याची ओला व सुका असे वर्गीकरण होत नसेल तर याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करा. जनजागृती करूनही कचऱ्याचे वर्गीकरण होत नसेल तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करा. प्रदूषण रोखणे केवळ महापालिकेची जबाबदारी नसून नागरिकांची ही जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी कचरा वर्गीकरण करूनच द्यावा. सिंगल युज प्लास्टिक बाबत सर्वसामान्य व्यापारी विक्रेते यांच्यावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई न करता त्यांनी हे प्लास्टिक कुठून आणले. त्या रिटेल व होलसेल विक्रेत्यासह जेथे प्लास्टिकची उत्पत्ती होते त्यांच्यावर कारवाई करा. गरज पडल्यास असे प्लास्टिक निर्मितीचे कारखाने प्रदूषण नियंत्रण मंडळाने सील करावेत. नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी महापालिकेबरोबरच शेजारील गावांनीही एसटीपी प्रकल्प कुठे कुठे उभा करा. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ही पहिलीच बैठक आहे. पुढील बैठक जिल्हाधिकारी, आयुक्त व मख्य कार्यकारी अधिकारी अशी जिल्हास्तरावर संयुक्त बैठक घेणार असलेचे सांगून टप्प्या टप्प्याने पंचगंगा नदी शंभर टक्के प्रदूषण मुक्त करणार असलेचे सांगितले.

            यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तांत्रिक सल्लागार नंदकुमार गुरव, हवा प्रदूषण नियंत्रणाचे सहसंचालक रवींद्र आंधळे, जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे, प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे, उप प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, विद्यासागर किल्लेदार, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त कपिल जगताप, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, कनिष्ठ अभियंता अवधूत नेर्लेकर उपस्थित होते