कोल्हापुरातील छ. शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पुतळ्याला मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडून पुष्पहार अर्पण

कोल्हापूर : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग हे सोमवार (दि. 28) रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर त्यांनी अंबाबाई मंदिर येथे देवीचे दर्शन घेतले.

त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष विजय जाधव, डॉ राजवर्धन, विशाल शिराळकर, विजय अगरवाल, अमर साठे, अवधूत भाट्ये, रविकिरण गवळी, संजय जासूद, धीरज पाटील, रविंद्र पोवार, गिरीष साळोखे आदी उपस्थितीत होते.