कोल्हापूर : शिवसेनेचे मा. जिल्हाप्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 1 कोटी 25 लाखांच्या विविध विकासकामाचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने उपस्थित राहिले.
यावेळी आमदार अशोकराव माने बापू, मुरलीधर जाधव, प्रकाश पाटील, अमोल बानदार, किरण कांबळे, मंगलराव माळगे, विजय कुमार स्वामी, अभयकुमार मगदूम, सचिन कुमार शिंदे, गोगा बानदार, सागर कांबळे, शिवानंद पणदे, अनिल कांबळे, महेश नाजरे माजी सरपंच आदी उपस्थित होते.