पाकिस्तानी मुस्लिम अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हुपरी येथे आंदोलन

कुंभोज (विनोद शिंगे)

जम्मु काश्मीरमध्ये पहलगाम येथे फिरायला गेलेल्या हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या या झालेल्या पाकिस्तानी मुस्लिम अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख अजितराव सुतार यांनी पाकिस्तानच्या या वारंवार सुरू असलेल्या कुरघोड्या थांबवायच्या असतील तर आता पाकिस्तान वर थेट आक्रमण करणे हा एकमेव पर्याय आहे देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीनी लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा अशी भावना व्यक्त केली यावेळी शहर प्रमुख नितीन गायकवाड व युवासेना शहर प्रमुख अजित उगळे यांनी पर्यटकावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

हुपरी मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना हातकणंगले तालुका प्रमुख अजितराव सुतार यांच्या नेतृत्वाखाली हुपरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चौखंडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना शहर प्रमुख नितीन गायकवाड,युवासेना शहर प्रमुख अजित उगळे,बंडामामा वाईंगडे,संदीप सिद्धनुर्ले, अभि मानकपुरे,प्रवीण पाटील,संदीप आपटे,प्रताप भोसले,प्रशांत साळोखे,पवन घाटगे,अमोल लोहार,शिवाजी मोरे,शरद सुतार,रमेश सुतार,सुजित देसाई,गौरव नेमिष्टे,किशोर निकम,बजरंग पाटील,निशांत पोळ,प्रवीण वाशीकर,योगेश कळंत्रे,किरण भिवटे,कृष्णात मगदूम,संदीप बरगे,बाळकृष्ण पाटील,सचिन यादव,महेशराव जोके महादेव सुतार,श्रीशैल्य स्वामी,उत्तम गिरी,हरीभाऊ पेटकर,करण लोहार,अभिजित लोहार,किरण पाटील,नंदकुमार नागावकर शिव प्रतिष्ठान,बजरंग दल पदाधिकारी कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

🤙 9921334545