उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आ. राजेंद्र पाटील यड्रावकरांनी श्रीमज्जीनेंद्र पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे दिले निमंत्रण

कोल्हापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना श्रीमज्जीनेंद्र पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव,चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर चे वात्सल्य निमंत्रण आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.

मूलनायक श्रीमद्देवाधिदेव श्री 1008 चंद्रप्रभ तीर्थंकर दिगंबर जिनमंदिर तसेच नूतन मानस्तंभोपरी चतुर्मुख जिनबिंब श्रीमज्जीनेंद्र पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव शुभस्थान– आचार्य श्री विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालय,माय स्कूलच्या शेजारी चौंडेश्वरी सूतगिरणीच्या समोर कोल्हापूर –जयसिंगपूर रोड,चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर (महाराष्ट्र) या ठिकाणी रविवार दिनांक 4 मे 2025 ते शुक्रवार दिनांक 9 मे 2025 पर्यंत आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे.हा पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव प.पू.युवासम्राट,क्रांतीरत्न,प्रवचन केसरी,संत वात्सल्यनिधी,जिनवाणी कंठभूषण,सम्यक रत्नाकर,ज्ञान दिवाकर,वात्सल्य मूर्ती आचार्य श्री 108 चंद्रप्रभसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सानंद संपन्न होणार आहे.या पंचकल्याणक प्रतिष्ठा महा महोत्सवाचे वात्सल्य निमंत्रण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना देण्यात आले.याप्रसंगी जयसिंगपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर) तसेच विद्या सन्मतीदास सेवा संस्थान कोल्हापूरचे संचालक नितीनजी पाटील उपस्थित होते.

🤙 9921334545