हातकणंगले दुय्यमनिबंधक कार्यालयात ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा-जिल्हाप्रमुख संजय चौगुले

कुंभोज  (विनोद शिंगे)
हातकणंगले येथील दुय्यम निबंधक श्रेणी -०१ हातकणंगले या विभागांमध्ये 18 ऑक्टोंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 या वर्षभराच्या कालावधीमध्ये तुकडे बंदी आणि रेरा कायद्याचे उल्लंघन तसेच महाराष्ट्र नोंदणी अधिनियम 1908 आणि 1961 च्या नियम 44 चे उल्लंघन करून विसंगत जमीन खरेदी व्यवहार झाल्याच्या तक्रारीनुसार, दुय्यम निबंधक दिलीपकुमार काळे यांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या संशयित खरेदीदस्ताची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील मुद्रांक विभागाच्या 18 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ‘त्या’ संपूर्ण वर्षभरातील संपूर्ण दस्तऐवजाची तपासणी करून चौकशी अहवाल सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक (पुणे) यांना तत्काळ सादर करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हा निबंधक मल्लिकार्जुन माने यांनी दिले होते.

 

सदर अहवालातील शेऱ्याप्रमाणे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन त्याला निलंबित करणे गरजेचे असताना प्रशासनाने तडजोड करून त्याला पाठीशी घालण्याचे काम केले होते, याचाच गैरफायदा घेत सदर अधिकाऱ्याने पुन्हा “येरे माझ्या मागल्या” म्हणत जुन्या पद्धतीने दस्तांची खरेदी विक्री सुरू केली आहे.
दिनांक 12/01/2024 रोजी दस्त क्रमांक 455 व दिनांक 07/06/ 2024 रोजी दस्त क्रमांक 455 असे दोन वेगवेगळ्या तारखेला एकच दस्त नंबर टाकून बोगस दस्त तयार केल्याचे उघडकीस आले आहे. जुने बनावट दस्ताचे खरेदी विक्री प्रकरण ताजे असताना राजेरोसपणे नवीन बोगस दस्त नोंदणी करण्याचे धाडस या अधिकाऱ्याने केलेले आहे. ज्या-ज्या वेळी या अधिकाऱ्याने ठरवून आपली रजा टाकली आहे, त्या त्या वेळेला वरिष्ठ लिपिकाला पुढे करून बेकायदेशीर दस्तांची नोंदणी केली आहे. या कालावधीत झालेले ‘ते’ सर्व दस्त बोगस किंवा कागद त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांच्या रजेच्या काळातील झालेल्या सर्वदस्तांची पुन्हा नव्याने चौकशी करून तात्काळ या भ्रष्ट अधिकाऱ्यावर तसेच या गंभीर गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या सहभागी असलेल्या सर्व लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत.
हा सर्व प्रकार गंभीर असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच पाठीशी घातल्यामुळे हातकणंगले येथील दुय्यम निबंध कार्यालयात बोगस प्रकरण वाढीस लागले आहेत. या सर्व प्रकारांवरून असे लक्षात येते की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच या भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवण्याचे काम केले आहे. मुद्रांक विभागाच्या 18 अधिकाऱ्यांनी सदरील बनावट व बोगस दस्त खरेदी विक्री प्रकरणी बनवलेला अहवाल सार्वजनिक करावे अशी मागणी करून देखील सदरील अहवाल आजतागायत सार्वजनिक करण्यात आलेला नाही आहे.
सदरील बनावट खरेदी विक्री दस्त प्रकरणाबाबत संबंधित विभागाकडे मी पत्रव्यवहार केला असता, माझ्या कार्यालयास सहाय्यक जिल्हा निबंधक वर्ग -०१ कोल्हापूर, यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रासनुसार दुय्यम निबंधक श्रेणी-०१ हातकणंगले, यांच्या नावाने दिनांक 07/06/2024 रोजी बनावट सही व शिक्क्याचा वापर करून बोगस दस्त तयार करण्यात आल्या बाबतचे लेखी कळविण्यात आले आहे तसेच सदर व्यक्तीच्या बाबतीत योग्य तो तपास करून गुन्हा नोंद करण्याबाबत पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे हुपरी, ता. हातकणंगले यांना दिनांक 01/08/2024 रोजी अहवाल सादर केलेला आहे, परंतु अद्याप एकाही गुन्हेगारास यामध्ये अटक झालेली नाही किंवा त्यांच्यावर साधा गुन्हा देखील नोंद झालेला नाही.
मे. तलाठीसो यांच्या सही शिक्याच्या फेरफार पत्रकानुसार सदरचा बनावट दस्त तलाठी कार्यालय पट्टणकडोली, ता. हातकणंगले येथे नोंदणी करून सदरचे प्रकरण नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आल्याचे समजताच सदरील नोंद केलेला बनावट दस्त पुन्हा रद्दबातल करण्यात आलेला आहे व घातलेली नोंद देखील रद्द करण्यात आलेले आहे, यामध्ये सदरच्या दस्ताची नोंदणी कोणत्या निकषाद्वारे व कोणत्या कागदपत्रांच्या आधारे मा. तलाठीसो पट्टणकडोली व मंडल अधिकारी यांनी करून घेतली याचा देखील खुलासा करण्यात आलेला नाही, त्यामुळे या दोन्ही बेजबाबदार अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांचे देखील निलंबन होणे गरजेचे आहे.
दिनांक 15/01/2025 रोजी मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे ई-मेल द्वारे तसेच पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हापोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रत्यक्षपणे केलेल्या तक्रार अर्जानुसार संबंधित बनावट सही व शिक्याचा वापर करून बोगस दस्त तयार करणाऱ्या टोळीवर तसेच कोणतीही शहानिशा न करता केवळ आर्थिक हव्यासापोटी अशा या बोगस दस्तांची नोंद शासन दरबारी करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली असता प्रशासनाकडून अद्याप याप्रकरणी कोणावरही कसलीही कारवाई झालेली निदर्शनास आलेली नाही व याबाबतीत मला प्रशासनाकडून कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.
बनावट सही व शिक्क्याचा वापर करून बोगस दस्त तयार करणे ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा सर्वच लोकांवर कठोरातील कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही हातकणंगले तहसील कार्यालय येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करीत आहोत असे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी सांगितले.विनोद शिंगे कुंभोज

🤙 8080365706