पाच वर्ष मेहनत घ्या, काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल : नाना पटोले

भंडारा  : विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस  पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भंडाऱ्यात पहिला मेळावा पार पडला. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीनंतर भंडाऱ्याचे पक्ष निरीक्षक वजाहत मिर्झा आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्यात. 

 

महिला कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा केवळ निवेदन देण्यासाठी किंवा मोर्चे काढण्यासाठी वापर करू नका. यासाठी लागणाऱ्या गाडीच्या खर्चासाठी देखील कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करावे आणि केवळ निवडणुकीपुरता वापर न करता पक्षाच्या होणाऱ्या बैठकांमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशी भावना व्यक्त करण्यात आल्यात.

🤙 9921334545