संजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकर यांचे क्रीडा क्षेत्रात लक्षणीय यश

कुंभोज (विनोद शिंगे)
संजय घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थी ओंकार पडळकर याने ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून विद्यापीठाचा गौरव वाढवला आहे. तसेच, त्याने आय एफ बी बी युनिव्हर्सिटी २०२४ हा प्रतिष्ठेचा किताब जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप निर्माण केली आहे.

या अभूतपूर्व यशाबद्दल विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, क्रीडा अधिकारी सुर्यजीत घोरपडे यांनी ओंकारचे अभिनंदन केले. या यशामध्ये विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.

ओंकारच्या या मेहनती आणि कौशल्यामुळे त्याची निवड २०२५ मध्ये होणाऱ्या
अर्नोल्ड क्लासिस स्पर्धेसाठी झाली आहे, ही जगभरातील सर्वोत्कृष्ट बॉडीबिल्डर्ससाठी अत्यंत प्रतिष्ठेची संधी मानली जात आहे.

संजय घोडावत विद्यापीठ क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असून, ओंकारसारखे विद्यार्थी विद्यापीठाचा नावलौकिक उजळवतात. ओंकारला भावी वाटचालीसाठी सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे