बाबूजमाल रस्याची दुरावस्था लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

कुंभोज  ( विनोद शिंगे)
बाबूजमाल दर्गा कुंभोज येथे हिंदू मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन तसेच सर्व जाती व धर्माचे लोक मोठ्या श्रध्देने येतात.सांगली, मीरज, कराड, सातारा, इचलकरंजी, कोल्हापूर, निप्पाणी, बेळगाव व कर्नाटकातील बरेच भाविक बाबूजमाल दर्गा कुंभोज येथे दर गुरुवारी व रविवारी तसेच आमावशा व पौर्णिमेला येतात.

 

बाबूजमाल दर्ग्याला जाणारा रोड बरीच वर्षे झाली खराब झाला आहे.
आमदारकीची निवडणूक जवळ आलेली असताना निवडणूकी पूर्वी आठ महिने आधी माननीय प्रकाश आवाडे यांचा बाबूजमाल फाट्याजवळ डिजिटल बोर्ड लागला होता. त्याच्यावर लिहले होते की
( फाट्यापासून ते बाबूजमाल दर्ग्याला जाणाऱ्या रोड साठी 3 कोटी 50 लाख रुपये मंजूर.)
सर्वच लोक खुष झाले कारण हा मतदारसंघ प्रकाश आवाडे यांचा नसताना सुध्दा त्यांनी या रस्त्यासाठी 3 कोटी 50 लाख रुपये मंजूर केले.
नंतर खासदारकीची निवडणूक सहा महिन्यांवर असताना परत माननीय धैर्यशील माने यांचा फाट्याजवळ बोर्ड लागला त्यावर लिहले होते
फाट्यापासून ते बाबूजमाल दर्ग्यापर्यंतच्या रोडच्या दुरुस्तीसाठी 30 लाख रुपये मंजूर.परंतू आमदार व खासदार यांची निवडणूक होवून बरेच दिवस उलटले परंतु रस्ता मात्र बोर्डापुरताच मर्यादित राहीलाआहे.
आवाडे साहेबांनी 3 कोटी 50 लाख रुपयांचा रस्ता मंजूर केला. नंतर धैर्यशील माने यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 30 लाख मंजूर केले.
पण काॅन्ट्रॅक्टरने रस्ता केला नाही. व त्याची दुरुस्तीही केली नाही. या रस्त्यावर मोठे तीन अपघात झाले. व अपघातातील लोकांना दवाखण्यात ॲडमीट करावे लागले.आता परत निवडणूक जवळ येईल परत निवडणूकीला कोणाला उभारण्याचे असल्यास बोर्ड लावण्यासाठी डांब तयार आहे.परंतू रस्ता मात्र कागदावरच मंजूर आहे.