कोल्हापूर: हातकणंगले येथील सागर पुुजारी यांची मुलगी ओवी पुजारी हिला एसएसपीई हा दुर्मीळ आणि गंभीर आजार झाला आहे. पहिलीत शिकणार्या या मुलीची हालचाल मंदावत जावून तिला अचानक झटके येवू लागले. या आजाराची नोंदच नसल्यानं विमा संरक्षणही नाही. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतल्यानंतर निधी कसा उपलब्ध करून देणार अशी अगतिकता त्यांनी व्यक्त केली.
मात्र लेकीच्या उपचारासाठी वडिलांनी जमीन विकली. मुलीच्या उपचारासाठी वडिलांनी थांयलंड देशातून इंजेक्शन आणली आहेत. या इंजेक्शनचे डोस सध्या सुरू आहेत. सध्या तिला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. आमदार सतेज पाटील यांनी या मुलीच्या उपचारासाठी मदतीचा हात दिला असून त्यांनी तातडीने पंचवीस हजाराची मदत दिली आहे.