आ. सतेज पाटील यांची श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्या पालखी सोहळ्यास उपस्थिती

कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकटदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ रूईकर कॉलनी यांच्याकडून आयोजित येणाऱ्या पालखी सोहळ्याला दरवर्षी प्रमाणे आमदार सतेज पाटील उपस्थित राहीले . यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांचीही सहउपस्थिती लाभली.

 

या सोहळ्यात श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. टाळ मृदुंगाचा गजर, पारंपारिक वाद्ये, आणि स्वामींच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्ती सागरात न्हावून निघाला होता.
याप्रसंगी, श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाचे अध्यक्ष नारायण बुधले, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, प्रवीण केसरकर, उदय फाळके, ट्रस्टी जयसिंग जाधव, भाऊ घाटगे, विघ्नेश नाईक, रमेश काटकर, बाबुराव पवार, बाबा जांभळे यांच्यासह इतर विश्वस्त व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.