कोल्हापूर : आमदार विनय कोरे यांनी उदगिरी (ता.शाहूवाडी) येथे दरवर्षीप्रमाणे भरणाऱ्या काळम्मा देवीच्या यात्रेनिमित्त काळम्मा देवीचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच यात्रेनिमित्त सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाहूवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती बबन पाटील,आबासाहेब पाटील,उदगिरी गावचे सरपंच शरद घोलप,उपसरपंच सुनिल पाटील,माजी सरपंच विठ्ठल पाटील,पांडुरंग पाटील,तंटामुक्त अध्यक्ष दिगंबर पाटील,पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील,स्वराज्य युवा संघटना उदगिरी (मुंबई) अध्यक्ष अविनाश पाटील,यात्रा कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल सखाराम पाटील,यात्रा कमिटीचे सचिव लक्ष्मण पाटील,उपसचिव विलास पाटील,शंकर शिंदे,राजू खोत,अंकुश पाटील,संभाजी पाटील,आनंदा बंडू पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते…